fbpx
” ग्रामपंचायत  निहाय विकासकामे आढावा बैठक “

पंचायत समिती सभागृहात ग्रामपंचायत निहाय गावांची विकासकामे आढावा बैठक आयोजित केली होती. मावळ तालुक्यातील खांडी, डाहुली, कशाळ, भोयरे, आंबळे, माळेगाव खु., सावळा, इंगळुन, निगडे, नवलाख उंबरे या गावातील ग्रामपंचायत प्रतिनिधींशी यावेळी चर्चा करण्यात आली. त्यांच्यासोबत विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामांबाबत असणाऱ्या समस्यांचा आढावा घेऊन आवश्यक प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.आजच्या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित असल्यामुळे काही कामांबाबतच्या अडचणींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. काही ग्रामपंचायतीच्या मागण्या, समस्यांचे प्रस्ताव जलदगतीने मार्गी लावण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. तसेच पुढील काळात प्रत्येक विभागाने समन्वय ठेवून काम केल्यास अडचणी निर्माण होणार नाहीत. ग्रामपंचायत पातळीवर प्रश्न समजून घेण्यासाठी त्याची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत. निधीचा नियोजनबद्ध वापर होऊन सर्व गावांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी हा या बैठकीमागचा उद्देश आहे. यावेळी तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती-उपसभापती, सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp