दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार काल लोणावळा येथे उद्योजक हनिफभाई शेख यांच्या परिवारातर्फे करण्यात आला.
‘जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवलेली ही मुले आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत.’
दहावीच्या परीक्षेत यशाची शिखरे गाठणाऱ्या, प्रतिकुल परिस्थितीवर मात करणाऱ्या या गुणवंतांची स्वप्नं साकार व्हावीत, त्यांच्या पंखांना बळ मिळावे यासाठी या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात या कौतुक सोहळ्यात देण्यात आला.
यावेळी उद्योजक हनीफभाई शेख, फरहानभाई शेख, झिशानभाई शेख, फिरोज शेख, नगरसेविका आरोही तळेगावकर, सुवर्णा अकोलकर, बिंद्रा गणात्रा, ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ गवळी, विलास बडेकर,राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस लोणावळा महिला अध्यक्षा मंजुश्रीताई वाघ व इतर मान्यवर उपस्थित होते.