मावळ विधानसभेतील प्रमुख पर्यटन क्षेत्र असलेल्या लोणावळा शहरात पर्यटन, रोजगार व आरोग्य ह्या विषयी भरीव कार्य करण्याच्या दृष्टीने मा. मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.अशोकजी चव्हाण साहेब यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंतजी पाटील साहेब व सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
लोणावळा शहरात असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे रायवुड पार्क विकसित करुन पर्यटकांसाठी खुले करणे, स्थानिकांना रोजगारनिर्मीती करणे या उद्देशाने त्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश मंत्रीमहोदयांनी दिले. तसेच लोणावळा येथील १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालय अंदाजपत्रकास मान्यता घेऊन लवकरात लवकर काम सुरु करण्यासाठी सा.बां. विभाग संबधित अधिकाऱ्यांना त्वरीत कार्यवाही करण्याची सुचना केली.