fbpx
बऊर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण
आज बऊर येथे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
“विकासाचा वेग वाढवून त्यादृष्टीने काम करणे काळाची गरज आहे. एकमेकांमधील समन्वय व सामंजस्य आणि विकासाची तळमळ यामुळे नक्कीच मावळ तालुक्याचा कायापालट होत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सर्व लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे.” असे मत यावेळी मांडले.
यावेळी माझ्यासह, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, कृषी-पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषराव जाधव, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, बाळासाहेब भानुसघरे, अतुल राऊत, संजय शेडगे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, बऊर ग्रामपंचायत सरपंच अलकाबाई पांडे, उपसरपंच भरत कंक, ग्रा.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp