मावळ तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत बेलज येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
आदिवासी समाजाच्या विविध समस्या व मागण्यांवर आदिवासी बांधव व प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा झाली.




‘आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. आदिवासी बांधवांचे शिक्षण, रोजगार, आरोग्य या सुविधांबाबत शासन संवेदनशील असून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आदिवासींचा विकास करावयाचा असेल तर मूलभूत सोयीसुविधा सुधारल्या पाहिजेत. विविध प्रश्नांची
सोडवणूक करण्यासाठी आदिवासी विभाग यांच्याकडे पाठपुरावा करु, गरज पडल्यास मा.आदिवासी विकास मंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल, असे यावेळी सांगितले.
यावेळी आदिवासींच्या विकासाकरिता उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या संस्था बिरसा ब्रिगेड मावळ, बिरसा क्रांती दल मावळ, आदिवासी विचार मंच, व पदाधिकारी अध्यक्ष शंकरभाऊ बोऱ्हाडे, सचिव गणेश वाघमारे, उपाध्यक्ष जयदास सुपे, योगेश मदगे उपसरपंच कशाळ, अंकुश चिमटे, राघोजी तळपे अध्यक्ष राष्ट्रवादी आदिवासी सेल, शिवाजी कशाळे, किरण हेमाडे संघटक, विशाल धडे प्रसिद्धीप्रमुख, कैलास करवंदे सरपंच सावळा, लक्ष्मण केंगले ग्रा. सदस्य माळेगाव, उमाकांत मदगे ग्रा. सदस्य टाकवे, सुरेश बगाड, शंकर हेमाडे, दिलीप बगाड कोषाध्यक्ष, रोहन मदगे, मंगेश लांघी, चिमाजी कोकाटे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.