राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ, उद्योजक डॉ.अभय फिरोदिया (फोर्स मोटर्स लि.) व श्री.शंकरराव बा. शेळके यांच्या वतीने मावळ तालुक्यातील जनतेच्या मोफत सेवेसाठी दिलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री, कोरोना योद्धा डॉ.राजेशभैय्या टोपे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आरोग्यमंत्री ना.डॉ.राजेशभैय्या टोपे यांनी काल मावळ तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेतला. सर्वप्रथम तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात प्रशिक्षण केंद्र येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. तेथील सोयी सुविधा तसेच उपचारांविषयी थेट रुग्णांशी संवाद साधून त्यांनी विचारणा केली. त्यानंतर कोरोनाशी सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या ‘कोविड-19 मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्रातील’ यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतला. केंद्रातील प्रत्येक कक्षांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी आवश्यक वैद्यकीय सामुग्री व साहित्य प्रातिनिधिक स्वरूपात नगरपरिषदेकडे देण्यात आले. मावळ तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता केलेल्या व्यापक विविध उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले.
“माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवावी. आपण एकत्रितपणे या संकटाचा सामना करु आणि ही लढाई नक्कीच जिंकू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.