fbpx
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ ही आरोग्य मोहीम
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ ही आरोग्य मोहीम राबविण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत शहर कोरोना मुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असून नगरपरिषद हद्दीतील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शासकीय यंत्रणा तपासणी करणार असली तरी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही फार गरजेचा आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा विचार करून, राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून या मोहिमेत एकत्रितपणे सहभागी व्हा. सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, स्वयंसेवी सामाजिक संस्था व नागरिकांनी स्वयंफुर्तीने सामाजिक बांधिलकी म्हणुन पुढे येऊन कोणताही संकोच न ठेवता, भीती न बाळगता तपासणीसाठी सहकार्य करा. या आरोग्य मोहिमेत सर्वांनी एकत्रितपणे सहभागी होण्याची गरज आहे.
या मोहिमेअंतर्गत मावळ तालुक्यात टप्प्याटप्प्याने नागरिकांच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. कोरोना विरुद्ध खबरदारी घेणे महत्त्वाचे असून प्रत्येकाने आरोग्यविषयक छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी काही मार्गदर्शक सूचना अंगिकारणे आवश्यक आहे.
“कोरोनाचे संकट वाढत असताना जनतेचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपण सर्व सुविधा उभारत आहोत. लॉकडाऊन काळात आपण ही कोरोनाची लाट थोपविली होती. मागील अनेक महिन्यांपासून प्रशासनासह अहोरात्र मेहनत करीत आहोत. मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागेल. यासाठी लागणाऱ्या सर्व वैद्यकीय सामुग्री उपलब्ध करून देण्यात येईल. पल्स ऑक्सीमीटर, थर्मल गन, ॲटीजेन किट इ. साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
यावेळी आमदार सुनिल शेळके, प्रांत संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुणेश बागडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी रवी पवार, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, नगरसेविका संगीताताई शेळके, संदिप गराडे व इतर अधिकारी, मा.पत्रकार बंधु उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp