येथील ऐतिहासिक तलावाच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली झालेला अनागोंदी कारभार आणि अनियमितता या पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज प्रत्यक्ष तलाव परिसरात येऊन पाहणी केली. तसेच सद्यस्थितीत प्रशासनाकडुन काय कार्यवाही चालू आहे याची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसुदन बर्गे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक झिंजाड, उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
