कान्हे व लोणावळा येथील प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालय जागेची पाहणी, बांधकाम आराखडे, तांत्रिक बाबींची माहिती काल युवा नेते पार्थ अजितदादा पवार यांनी घेतली. लवकरात लवकर काम सुरू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शासन परवानग्या, निधी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मावळ तालुक्याच्या लोकसंख्येचा विचार करता अद्ययावत शासकीय रुग्णालये असणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयातून सर्व प्रकारची यंत्रणा परिपूर्ण केल्यास ही रुग्णालये सर्वसामान्य कुटुंबासाठी इतर रुग्णालयांपेक्षा चांगल्या सेवा देऊ शकतील. कोरोना सारख्या संकटात याची प्रकर्षाने उणीव सर्वांना जाणवली आहे. त्यामुळे पुढील काळात तातडीने पावले उचलीत काम लवकर सुरू व्हावे यासाठी प्रयत्नशील आहोत. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था कशी बळकट करता येईल यावर विस्तृत आराखडा बनविणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे.’ यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवी पवार, विरोधी पक्षनेत्या शादानभाभी चौधरी, नगरसेवक भरत हारपुडे, सिंधु परदेशी, कल्पना आखाडे, बाळासाहेब कडू, मुकेश परमार, मंजूश्रीताई वाघ व इतर मान्यवर उपस्थित होते.

- August 7, 2020
- कार्यक्रम / समाजकार्य
- 0 Comments