fbpx

भरती व नोकरी फॉर्म

विदयार्थ्यांना उत्तम शिक्षण व तरुणांना नोकऱ्या हे धोरण खऱ्या अर्थाने समाजाला विकासाच्या दिशेने नेत असते. आपल्या मावळ तालुक्यात अनेक देशी विदेशी कंपन्या आहेत. पण अशा कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना खूपच कमी प्रमाणात रोजगार मिळतो. त्यामुळे मावळातील हुशार सुशिक्षित तरुण बेरोजगार राहतो.
त्यामुळे केवळ उत्तम शिक्षण मिळणे महत्वाचे नसून त्याचबरोबर चांगली नोकरी मिळणेही तितकेच महत्वाचे आहे. जनसेवक सुनिल शंकरराव शेळके यांनी तरुणांना सक्षम करण्यासाठी व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.
आपण किंवा आपल्या मित्र व नातेवाईक तळेगाव, चाकण, मावळ किंवा पिंपरी चिंचवड भागात नोकरीच्या शोधात असाल तर सोबत असलेला फॉर्म भरा व आपला बायोडाटा सोबत जोडा. सुनिल शंकरराव शेळके यांच्या माध्यमातून आपणास योग्य ती नोकरी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आपण या ठिकाणी देत असलेल्या कोणत्याही माहितीचा कसलाही गैरवापर होणार नाही याची आम्ही खात्री देतो. आपल्या उज्वल भविष्यासाठी तात्काळ नोंदणी करा.

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp