मावळ तालुक्यातील पर्यटनाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण विषयांबाबत आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री मा.आदित्यजी ठाकरे ( Aditya Thackeray) यांची भेट घेतली. व मावळ तालुक्यात पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा केली.
लोहगड-विसापूर ते एकविरा पायथा या रस्त्याचे काम सुरू व्हावे. तसेच एकवीरा देवी मंदिर परिसर पर्यटकांना प्रसन्न वाटेल अशा प्रकारे सुशोभित करणे गरजेचे आहे. या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी, असे निवेदन यावेळी दिले.
ही कामे लवकरच सुरु करण्यात येतील असे आश्वासन मा.मंत्री महोदयांनी दिले.
कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळे बंद होती. लॉकडाऊन, कोरोना यामुळे पर्यटन क्षेत्रालाही चांगलाच फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पर्यटनासारख्या उद्योगाचे नुकसान या संकटामुळे झाले आहे. सद्यस्थितीत मागील काही दिवसांपासून अनेक पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास करुन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवरही भर देता येईल, त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
यावेळी माझ्या समवेत मा.नगरसेवक संदिपनाना शेळके उपस्थित होते.