fbpx

आमच्या संस्था

माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघ

mai mauli

ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारी प्रेरणा अनेक पिढ्या घडविण्यासाठी पुरेशी असते. ज्यांनी आयुष्यभर झिजून आपल्याला हे उज्वल आयुष्य दाखवलं अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुनील शेळके यांनी माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाची स्थापना करून ज्येष्ठांना संघटित करण्याचे काम केले. तब्बल अठरा हजार ज्येष्ठ नागरिकांनी या महासंघात नोंदणी केली असून त्यांना विविध दवाखान्यांमध्ये सवलतीच्या दरात उपचार मिळतात. वर्षभर माय माऊलीच्या सर्व ज्येष्ठ सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुनील शेळके करतात. माय माउली फाउंडेशन ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणारी सर्वोत्तम संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. 

लोकनेते श्री. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठाण मावळ

loknete gopinathji munde pratishthan

जनसामान्यांसाठी आजन्म लढणारे आणि गोरगरिबांचे कैवारी स्वगीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नावाने सुनिल शेळके यांनी लोकनेते श्री गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठाण मावळ ची स्थापना करून त्यामाध्यमातून विविध गावांमध्ये विकासकामे करण्याचा संकल्प केला. अनेकांना या संस्थेच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचा सुनिल शेळके यांचा प्रयत्न असतो. मूलभूत सुविधा, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण व आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी हि सामाजिक संस्था काम करत असून या माध्यमातून मावळ तालुक्यातील अनेक नागरिकांना फायदा झाला आहे.  

माय मावळ फाउंडेशन

my maval

मावळ तालुक्यातील विध्यार्थी तरुण तरुणींसाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचे काम माय मावळ फाउंडेशन च्या माध्यमातून सुनिल शेळके यांनी केले आहे. या फाउंडेशनच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम तालुकाभरात राबवले जातात. ज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध सण समारंभ तसेच तरुणांमधील कलागुणांची जपणूक करणारे विविध कार्यक्रम राबवले जातात. मावळ तालुक्यातील सर्वाना आपलीशी वाटणारी हि संस्था तरुणांसाठी प्रेरणादायक कामे करते. 

श्री. सुनिल शेळके फाउंडेशन

sunil shelke foundetion

तरुणांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सुनील शेळके यांनी सुनील शेळके फाउंडेशन ची उभारणी केली. या संस्थे अंतर्गत आतापर्यंत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुनील शेळके यांनी केले आहे. क्रीडा संस्कृती जोपासणे आणि त्याला चालना देणे तसेच अव्वल दर्जाचे खेळाडू घडवून त्यांना संधी उपलब्ध करून देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना क्रीडा क्षेत्रात कामगिरी करण्याचीही संधी सुनील शेळके यांनी दिली आहे. 

सहभागी व्हा

फॉर्म भरा आणि आमच्या फाऊंडेशनमध्ये सामील व्हा.

0 +
एकूण सदस्य

मावळ तालुक्यातील एक दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून उदयास आलेले सुनिल शंकरराव शेळके यांनी समाजातील विविध घटकांना एकत्रित करण्यासाठी माय माऊली फाउंडेशन, लोकनेते श्री. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठाण मावळ, माय मावळ फाउंडेशन व सुनिल शेळके फाउंडेशन अशा संस्थांची उभारणी केली आहे. या संस्थांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना मदत मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व सर्वांसाठी नव्या संधी निर्माण व्हाव्यात हे त्यांचे उद्दिष्ट्य आहे. आपणही या संस्थांमध्ये सहभागी होऊ शकता.. त्यासाठी सोबत असलेला हा फॉर्म भरा.. आणि मावळच्या विकासाचे साक्षीदार व्हा. 

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp