सामान्य प्रश्न
sunilshelke.org मध्ये नेमकं काय आहे?
मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिक आणि सरकार यांच्यात भागीदारी निर्माण करण्यासाठी sunilshelke.org एक अभिनव व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून नागरिकांचे विचार, सूचना आणि तळागाळातील योगदानाचा मागोवा घेऊन सुशासनासाठी नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहित करण्याचे सुनील शेळके यांचे उद्दीष्ट आहे. मावळच्या विकासाच्या या अनोख्या उपक्रमात नागरिक सहभागी होऊ शकतात.
sunilshelke.org मध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे?
sunilshelke.org मध्ये सहभागी होण्यासाठी गुगल वर जाऊन sunilshelke.org वर नोंदणी करा. आपले नाव, ईमेल आयडी इ. वैयक्तिक तपशील या ठिकाणी द्यावेत. आपल्यातील विविध कलागुणांबद्दल तसेच कौशल्याबद्दल माहिती द्यावी. या ठिकाणी आपण दिलेली सर्व वैयक्तिक माहिती सुरक्षित असेल. आपली कोणतीही वैयक्तिक ओळख किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला जाणार नाही याची खात्री आम्ही देतो.
सहभागाची पध्दत कोणती?
या व्यासपीठावर विविध गट बनविण्यात आले असून ज्यात आपण सहभाग घेऊ शकता तसेच विशिष्ट कार्यसमूहाशी संबंधित विविध कार्ये, चर्चा, मतदान, प्रश्नोत्तरे आणि ब्लॉगद्वारे इथे आपल्याला आपली मते मांडण्याचा तसेच सूचना करण्याचा पर्याय आहे.