रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे Covid-19 मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 200 पीपीई कीट देण्यात आले.
कोरोनामुळे मृत्यू झाला तर कुटुंबातील कोणाला अंत्यसंस्कार करता येत नाही. परंतु नगरपरिषदेचे कर्मचारी संसर्गाचा विचार न करता आपला जीव धोक्यात घालून पवित्र विधी करण्यास धाडसाने पुढे येत आहेत. अशा कोरोना योद्धांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी पीपीई कीट देणे हे आपले कर्तव्य आहे.
यावेळी माझ्या समवेत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक झिंजाड, संतोष शेळके अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, संस्थापक रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी विलासजी काळोखे, मा.उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे, सचिव दिपक फल्ले, प्रकल्पप्रमुख मनोज ढमाले, संदीपभाऊ गराडे व इतर सर्व रोटरीयन्स उपस्थित होते.