मेकिंग द डिफरन्स व डोनेट कार्ट या संस्थांच्या वतीने मावळ तालुक्यात असणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांना जीवनावश्यक वस्तुंचे किराणा किटचे वाटप विठ्ठल रखुमाई मंदिर कल्हाट येथे करण्यात आले.
मुंबई डबेवाले संघटना १८९० पासुन मुंबई मध्ये कार्यरत आहे. गेल्या १३० वर्षांपासून सेवाभावी वृत्ती जपत मराठी बांधव काम करीत आहेत. धावत्या मुंबईच्या वेगाशी समरस होत नोकरदारांचे डबे कामाच्या जागेपर्यंत पोहचविण्याचे काम अचुकतेने करीत आहेत.
वेळेच्या अचुक नियोजनामुळे जगभरात ख्याती मिळवणाऱ्या डबेवाल्यांवर कोरोना संकटामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. लॉकडाऊन काळापासुन डबे देण्याचे कामही पुर्णपणे थांबले आहे. मावळ तालुक्यातील अनेक कुटुंबे यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत डबेवाल्यांसाठी या संस्थेनी मदतीचा हात पुढे केला त्याबद्दल त्यांचे आभार !!
यावेळी आमदार सुनिल शेळके, मा.दिपक विश्वकर्मा अध्यक्ष डोनेट कार्ट, योगेश दुबे सदस्य राष्ट्रीय बाल अधिकार आयोग, रामदास करवंदे अध्यक्ष डबेवाला संघटना, गुलाबराव म्हाळसकर माजी सभापती, दत्तात्रय शेवाळे पंचायत समिती उपसभापती, शांताराम कदम पंचायत समिती सदस्य, रुपेश म्हाळसकर अध्यक्ष मनसे मावळ, अनिकेत घुले युवा सेना प्रमुख मावळ, दत्तात्रय पडवळ सरपंच नवलाख उंब्रे, डॉ. प्रमोद दळवी, उल्हास मुके, प्रकाश बच्चे, संतोष जाचक सरपंच कल्हाट, सुनील शिंदे, जावेद मुलाणी उपसरपंच, मनोज करवंदे मा.सरपंच, तानाजी करवंदे, अशोक कुंभार, दिगंबर आगिवले, शिवाजी करवंदे व इतर मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.