देहूरोड उड्डाणपुलाची अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत पाहणी करुन देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे बैठक घेण्यात आली. देहूरोड येथील उड्डाणपुलाचे काम सध्या अर्धवट असून पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सेवा रस्त्यांचीही दूरुस्ती रखडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. उड्डाणपुलावरील पावसाचे पाणी थेट पुलाखालील सेवा रस्त्यावर सोडण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले असुन रस्ता असमतोल झाला आहे. पदपथाचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. अर्धवट स्थितीत असलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत.
यावेळी राकेश सोनवणे कार्यकारी अभियंता एमएसआरडीसी, परमार उपअभियंता, राजन सावंत कार्यालय अधीक्षक, प्रवीण गायकवाड कनिष्ठ अभियंता, दिनेश वारके लेखापाल, नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तु, ॲड. कृष्णा दाभोळे देहूरोड राष्ट्रवादी शहराध्यक्ष, भरत नायडू शिवसेना देहुरोड शहराध्यक्ष, ज्येष्ठ नेते रमेश जाधव, मिकी कोचर, व इतर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.