fbpx
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तालुक्यातील ७२३४ नुकसानग्रस्तांना २३ कोटी ६५ लाख मिळाली.
महाविकासआघाडी सरकारकडून निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मावळ तालुक्यातील ७२३४ नुकसानग्रस्तांना २३ कोटी ६५ लाख इतकी मिळाली आहे. आज तहसील कार्यालय, वडगाव मावळ येथे प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आले.
३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोरोनाशी लढा देत असताना तालुक्यासमोर एक नैसर्गिक आपत्ती उभी ठाकली ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांनी ५ जुन रोजी स्वतः नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. व वादळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व घरांच्या दुरुस्त्या यासाठी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आपण केली होती. कोणीही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही त्यासाठी सतत पाठपुरावा करत होतो. प्रशासन स्तरावर तातडीने पंचनामे पूर्ण करून अधिकाऱ्यांनी अहवाल दिला. त्यामुळे नागरिकांना भरपाई मिळण्यास मदत झाली.
“महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली, त्याबद्दल महाविकासआघाडी सरकारचे आभार”. !!
यावेळी प्रांत संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, मा.सभापती विठ्ठल शिंदे, पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा परिषद सदस्य शोभाताई कदम, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, महादु उघडे, काँग्रेस आय तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, नारायण ठाकर, अंकुश आंबेकर, सुदाम कदम, कैलास गायकवाड, सर्व सन्माननीय पत्रकार बंधू व इतर पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp