विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे पवना बंद जलवाहिनी व पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
माननीय अजितदादा यांनी पवना पुनर्वसन संबंधित सर्व माहिती घेऊन आवश्यक अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुनर्वसन जिल्हाधिकारी उत्तम पाटील, संजीव चोपडे अधिक्षक अभियंता पुणे पाटबंधारे मंडळ, महेश पाटील कार्यकारी अभियंता, अशोक शेटे उपअभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.