fbpx
पाणी पुरवठा योजनांची सद्यस्थिती बाबत आढावा बैठक
आज मंत्रालय येथे मा.ना.संजयजी बनसोडे (राज्यमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता) Sanjay Bansode यांच्या अध्यक्षतेखाली मावळ तालुक्यातील पाटण, डोंगरगाव-कुसगाव, डोणे-दिवड, खडकाळे, कार्ला, सिद्धिविनायक नगरी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड इतर प्रादेशीक पाणी पुरवठा योजनांची सद्यस्थिती बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सर्व पाणी पुरवठा योजनांचे काम निश्चित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचा कालावधी जरी 31 मार्च 2020 रोजी संपुष्टात आला असला तरी मंजुरी देण्यात आलेल्या आणि अपूर्ण पाणीपुरवठा येाजनांची कामे पूर्ण करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. या मिशनअंतर्गत सुरु असलेल्या कामांची सद्यस्थिती पाहता उर्वरित कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असून या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी काम करावे. या योजनांचे काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मा.मंत्रीमहोदयांनी संबंधित विभाग अधिकारी यांना दिले आहेत.
या बैठकीला मा.मंत्रीमहोदय, आमदार सुनिल शेळके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य अभियंता श्री.गजभिये यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp