कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखुन सामना करण्यासाठी आपण नेहमीच नवीन तंत्रज्ञानासह उपाययोजना शोधून त्या कार्यरत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. याच अनुषंगाने कोरोना सदृश रुग्णांसाठी उपायकारक व सुविधादायी उपक्रम आपल्या मावळवासियांसाठी करीत आहोत.
सध्या कोविड -19 च्या काळात औषधे जितकी महत्वाची आहेत. तितकेच प्लाझ्मा, रक्त यांची आवश्यकता निर्माण झालेली आहे. मात्र ऐनवेळी योग्य माहिती मिळत नाही हे प्रकर्षाने जाणवते आहे. ही गरज लक्षात घेऊन जेनेरिकार्ट मेडिसिन कंपनीच्या माध्यमातून आपण मावळवासियांसाठी नवीन वेब पोर्टल सुरु केले आहे.
यामध्ये आपण प्लाझ्मा, रक्त इ. मिळविण्यासाठी व देण्यासाठी आपले नाव नोंदवून त्या आवश्यक सेवा सुविधा देऊ-घेऊ शकता. ही सुविधा पूर्णपणे मोफत असून, गरजु व्यक्तींना त्याचा लाभ मिळेल. तसेच आपल्या संपर्कात असलेल्या अनेकांना या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगावे. ज्यामुळे गरजू व्यक्तींना, रुग्णांना व दात्यांना याचा योग्य वेळी उपयोग होईल.
जेनेरिकार्ट मेडिसिन कंपनी ही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळ येथे 1100 पेक्षा जास्त जेनेरिक औषधांच्या वितरण केंद्रांमार्फत 60 लाख पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देत आहे. ही कंपनी बाजार भावापेक्षा सुमारे 70% पर्यंत स्वस्त दरात जेनेरिक औषधे पुरवण्याचे काम करीत आहे.
तरी कृपया आपण
या संकेत स्थळावर (वेबसाईटवर) जाऊन Covid-19 Responce Initiative यावर क्लिक करून आपण आपली आवश्यक माहिती भरावी.
या आरोग्य उपक्रमात आपल्या सर्वांचा सहभाग व सहकार्य नक्की राहील अशी मी खात्री बाळगतो. या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या नात्याला आपण सारे मिळून अधिक दृढ करूयात.