fbpx
महाराष्ट्रात एका नव्या प्रगत औद्योगिक पर्वाची सुरुवात

महाराष्ट्र राज्याला प्रगतिपथावर घेऊन जाणे हे महाविकासआघाडी सरकारचे स्वप्न आहे. औद्योगिक विकासासाठी पाऊले उचलत असताना जेव्हा परदेशातील कंपन्या येथे गुंतवणुकीसाठी येतील किंवा इथलेच उद्योग विस्तारत असतील. तेव्हा त्यांना मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे. ती गरज सहजतेने पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महाजॉब्स’ च्या निमित्ताने एक महत्वाकांक्षी उपक्रम सुरु केला आहे. महाजॉब्स द्वारे महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या कौशल्याला साजेशा अपेक्षित जॉबच्या संधी पर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक कंपन्यांना कुठल्या प्रकारची कौशल्ये असणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हे महाजॉब्सवर नाव नोंदणी केलेल्या सर्वांना कळणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे कंपन्यांना हव्या असलेल्या मनुष्यबळाचाही प्रश्न सुटेल आणि जॉबच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांनाही रोजगार मिळेल. यानिमित्त महाराष्ट्रात एका नव्या प्रगत औद्योगिक पर्वाची सुरुवात होत आहे.लिंकवर जाऊन नावनोंदणी करु शकता

http://mahajobs.maharashtra.gov.in

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp