fbpx
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या आरोग्य मोहिमेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत बैठक
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही आरोग्य मोहीम राज्य सरकार राबवीत आहे. ही आरोग्य मोहीम महत्त्वपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मावळ सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत बैठक आज वडगाव येथे पार पडली. कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांना दैनंदिन आवश्यक बदल करून निरोगी जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. तसेच वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेणेबाबत ही आरोग्य मोहीम मार्गदर्शक ठरणार आहे.
ज्याप्रमाणे महाविकासआघाडी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्याच पद्धतीने आपण तालुक्यात आजपर्यंत सर्वच स्तरांवर आरोग्य सेवा सुविधांचे सक्षमीकरण करत कोरोना विरुद्ध लढा देत आहोत. आपल्या तालुक्यातील, गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य जपण्याची जबाबदारी घेऊन कोरोना रोखण्यासाठी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत ही मोहीम यशस्वी करण्याचे प्रयत्न सर्वांचे राहतील.
यावेळी आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा परिषद कृषी समिती सभापती बाबुराव वायकर, वरिष्ठ उपाध्यक्ष नगरसेवक गणेश खांडगे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष सुवर्णाताई राऊत, जि.प. सदस्या शोभाताई कदम, कुसुमताई काशीकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक घारे, तळेगाव शहर अध्यक्ष नगरसेवक गणेश काकडे, नगरसेवक किशोर भेगडे, तळेगाव शहर महिला अध्यक्षा सुनिताताई काळोखे, लोणावळा अध्यक्षा मंजूश्रीताई वाघ, तळेगाव दाभाडे नगरपरिषद उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, शितलताई हगवणे, अंकुश आंबेकर, देहुरोड शहराध्यक्ष ॲड.कृष्णा दाभोळे, उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे, तालुका युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे, विद्यार्थी अध्यक्ष नवनाथ चोपडे, बाळासाहेब मोहोळ, विशाल वहिले, भाऊसाहेब ढोरे, आफताब सय्यद, अतुल राऊत, विकी लोखंडे, संतोष राऊत, संजय शेडगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp