आपल्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायतीस नगर विकास विभागाकडून ‘वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत’ #दहा_कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासकीय इमारत बांधकाम करिता 4 कोटी रुपये, नगरपंचायत वडगांव मावळ प्रशासकीय इमारत बांधकाम करीता तीन कोटी पन्नास लाख रुपये तसेच लोणावळा नगरपरिषदेस दोन आर.सी.सी. पूल बांधण्याचे कामाकरिता तीन कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्याबद्दल महाविकासआघाडी सरकारचे मनापासुन आभार !!