मा.जिल्हाधिकारी पुणे डॉ. राजेश देशमुख यांनी वडगाव मावळ येथील ‘कोविड-19 मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्राला’ भेट देऊन सर्व कक्षांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. मावळ तालुक्यात एकाच ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी करण्यात आलेल्या या लोकाभिभुख उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
येथे येणार्या प्रत्येक नागरिकाचे योग्य समाधान झाले पाहिजे. त्यांच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय, प्रशासकीय सर्व अधिकारी, कर्मचारी कोरोना विरुद्ध लढत आहेत. रुग्णांना चांगले उपचार आणि सुविधा मिळाव्यात यासाठी शक्य आहे त्या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आयुष प्रसाद, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे, पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगराध्यक्ष मयूर ढोरे,उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, नगरसेवक राजेंद्र कुडे व इतर मान्यवर उपस्थित होते.