मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मावळचे आमदार सुनील शेळके यांचा विषेश सत्कार
मावळला पुन्हा एकदा मंत्रीपद भेटण्याची शक्यता
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले उद्घव ठाकरे यांनी परिवारासहीत कार्ला गडावर सव्वा अकरा वाजता आले होते. कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाचे मावळातील कार्ला या गडावर एकविरा देवी हे कुलदैवत असून मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, समन्वयक व उपनेते रविंद्र मिर्लेकर, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे उपनेते अनंत तरे हे होते.
गडावर बनविण्यात आलेल्या हेलीपॅडवर मुख्यमंत्री हेलीकाॅप्टर उतरुन मुख्यमंत्री सहकुटुंबा सहित देवीचे दर्शन घेतले व दर्शन घेतल्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांचा विषेश सन्मान कार्ला गडावर करण्यात आला. तसेच देवीचा कळस शोधुन काढणाऱ्या एल सी बी च्या टीमचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, सुलभा उभाळे, संपर्कप्रमुख बाळा कदम, मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, माजी उपसभापती शरद हुलावळे, राष्ट्रवादीचे मावळ तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, सुरेश गायकवाड, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, बाळासाहेब फाटक, गबळू ठोंबरे, अंकूश देशमुख, दीपाली भिल्लारे, मनिषा भांगरे शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.
शेळके यांचा विषेश सत्कार केल्यामुळे मावळला पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता सर्वांना वाटत आहे. शेळके यांचा विषेश सत्कार करून झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी श्री क्षेत्र कार्ला गडावरुन जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी हेलीकाॅप्टरने प्रस्थान केले आहे. यावेळी देवीच्या दर्शनाकरिता आले असल्याने पत्रकारांशी बोलणे त्यांनी टाळले.