वडगाव येथील मावळ हॉस्पिटल आजपासुन कोविड समर्पित आरोग्य केंद्र म्हणून लोकार्पण करण्यात आले. हे रुग्णालय 50 बेडचे असून 16 आयसीयू बेड, चार व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.
डॉ. पार्थ शिंदे, डॉ.अंजली शिंदे, डॉ. स्वप्नाली शिंदे, नोवा शिंदे या कुटुंबियांच्या वतीने कै.लक्ष्मीकांत शिंदे व डॉ. दिलीप भोगे सर यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला स्मरुण हे रुग्णालय समर्पित करण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेस आय तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष मयूर ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, अनिकेत घुले, अतुल राऊत, डॉ. संजय गभाले, डॉ. अशोक प्रजापती उपस्थित होते.