श्री क्षेत्र देहुगाव
येथे नव्याने उभारलेल्या ‘कोविड केअर सेंटर’ सज्जतेचा आज आढावा घेतला. या सेंटरमध्ये शंभर बेडची क्षमता असून यासाठी आवश्यक जागा संत तुकाराम महाराज संस्थान यांनी भक्तनिवासात उपलब्ध करून दिली आहे. अद्ययावत वैद्यकीय सामुग्रीसह आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. आरोग्य सेवेवर खूप भार वाढला आहे. परंतु आपल्या भागातील नागरिकांसाठी सर्व आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ‘स्वॅब कलेक्शन सेंटर’ ही चालू करण्यात आले आहे. योग्य व्यवस्था व स्वॅब कलेक्शन सेंटरचे सुरळीत नियोजन करून उद्यापासून हे सेंटर चालू होत आहे.
“सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ग्रामीण भागात देखील दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन आपणांस करतो.”
यावेळी माझ्या समवेत, तहसीलदार गीता गायकवाड, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका वैद्यकीय अधिकारी सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव, डॉ.कांबळे, ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी, अतुल गित्ते, मा.पंचायत समिती सभापती हेमलताताई काळोखे, जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे, सरपंच पूनमताई काळोखे, उपसरपंच स्वप्नील काळोखे, ग्रामपंचायत सदस्य रत्नमालाताई करंडे, हेमाताई मोरे, सुनिताताई टिळेकर, उषाताई चव्हाण, राणीताई मुसुडगे, सचिन कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष वैशाली टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रकाश हगवणे, माऊली काळोखे, प्रकाश काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकर कंद, मंडल अधिकारी गणेश सोमवंशी, विकास कंद, गणेश हगवणे, विशाल काळोखे, प्रशांत सुतार व इतर मान्यवर, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.