fbpx
Vadgaon Maval : मोहितेवाडी येथील महिलांना शिलाई मशीन व पीठगिरण्यांचे वाटप
Sunil Shelke News

पुणे जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोहितेवाडी येथील महिलांना शिलाई मशीन व पीठगिरण्यांचे वाटप करून महिलांना भाऊबीजेची अनोखी भेट देण्यात आली.

जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांच्या विशेष प्रयत्नातून महिलाबाल कल्याण व समाज कल्याण विभागातून मंजूर करण्यात आलेल्या शिलाई मशीन व पीठगिरण्यांचे वाटप आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी सभापती मंगलदास बांदल आदींच्या हस्ते करण्यात आले. मोहितेवाडी गावातील महिलांना भाऊबीजेच्या मुहूर्तावर ही अनोखी भेट देण्यात आली.

उपस्थितांमध्ये सरपंच विठ्ठल मोहिते, माजी सरपंच संदीप आगळमे, अनिल मोहिते, उपसरपंच संध्याताई शेळके, ग्रामपंचायत सदस्या अपर्णाताई शिंदे विद्याताई मोहिते, नगरसेवक राजेंद्र कुडे, उपसरपंच विशाल वाहिले, अनिल मालपोटे, भाऊसाहेब ढोरे, सुनील दंडेल, अक्षय रौंधळ, सुनील चव्हाण, सुजित माझिरे, संतोष मोहिते, खंडू मोहिते, साहेबराव मोहिते , रुपेश खाणेकर, दत्ता बोलाडे, धैर्यशील मोहिते, दत्ता मोहिते, तुकाराम मोहिते, नागेश मोहिते, अमित मोहिते, विकास भोसले आदी उपस्थित होते .

नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवून जनतेला न्याय मिळवून देण्याचा मनोदय व्यक्त केला.

Source: MPC News

Leave a Reply

Close Menu

Share on Social Media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp